आम आदमी पार्टी ची औरंगाबाद जिल्ह्यात घोडदौड़ सुरु

बातमी शेअर करा...

 

दै. बातमीदार | १९ ऑगस्ट २०२२ | औरंगाबाद:जिल्ह्याचे धडाडीचे नेते, दांडगा जनसंपर्क असलेले कार्यप्रणव, मृदुभाषी आणि कर्तव्यकठोर नेते रघुनाथदादा पाटील ह्यांच्या नेतृत्वात शहरासह ग्रामीण भागातही पक्षाचा विस्तार झपाट्याने होत आहे.

 

आपला संपूर्ण वेळ पक्षाला देणारे रघुनाथदादा ह्यांचा कामाचा आवाका आणि धडाका पाहून सर्व कार्यकर्त्यात बळ संचारते.

 

बूथ मॅपिंग करण्याचे कार्य वेगात सुरु करून तालुक्याला बैठका घेण्याचा सपाटा लावला. शहरातही प्रचंड काम उभे करून प्रचार समिती पदाधिकारी आणि सक्रिय निष्ठावाण कार्यकर्त्यांना सोबत घेत संघटन उभारण्याचे शिवधनुष्य पेलण्याचे काम मोठ्या जोमाने करत आहेत.

 

आज गंगापूर तालुक्यातील तालुका कार्यकारिणी विस्ताराबरोबर सर्कल प्रमुख, गण प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा अध्यक्ष, युवक आघाडी अशा जवळपास ४० ते ५० लोकाचा प्रवेश सोहळा करत नियुक्त्या केल्या.

 

या वेळी गंगापूर तालुका अध्यक्ष आणि तालुक्याभरात प्रचंड लोकप्रिय असलेले शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके यांच्या अथक प्रयत्नाने आणि जिल्हाध्यक्ष मा. रघुनाथदादा पाटील ह्यांच्या नेतृत्वात पक्षाचा हा असा नेत्रदीपक कार्यक्रम पार पडला.

 

यावेळी मराठवाडा सदस्य सदशिव पाटिल, ज़िल्हा सचीव संजय नांगरे, प्रचार समिती उपाध्यक्ष मोहम्मद बशीर, युवा आघाड़ी ज़िल्हाध्यक्ष आशीष शीसोदे, जनसंपर्कप्रमुख प्रवीण हिवाळे, औरंगाबाद तालुकाध्यक्ष जनार्धन साबले, इमरान बिल्डर, देवीदास लहाने, बालकृष्ण कदम आदि उपस्थित होते.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम