मराठा समाजाचे आंदोलन तीव्र : सातारा जिल्हा बंदची हाक
बातमीदार | ३१ ऑक्टोबर २०२३
राज्यातील अनेक जिल्ह्यात मराठा समाजाचे साखळी उपोषण जोरदार सुरु असतांना आज सकल मराठा समाजाच्या वतीने सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्यास शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे.
सकल मराठा समाज सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपाेषणास बसला आहे. आज सातारा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. दरम्यान फलटण येथे विद्यार्थ्यांनी आंदाेलन पुकारले आहे. जाेपर्यंत आरक्षण मिळणार नाही ताेपर्यंत शाळेत जाणार नाही असा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे. यावेळी आंदाेलनस्थळी विद्यार्थ्यांनी घाेषणा दिल्या.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम