शाहू महाराज छत्रपती मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३१ ऑक्बाटोबर २०२३

संपूर्ण राज्यात मराठा समाज आक्रमक झाला तर काही ठिकाणी हिंसक वळण देखील लागले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत कुणबी नोंदी असणाऱ्या मराठ्यांना आरक्षण देण्याची सुरुवात करणार असल्याची घोषणा केली आहे. तरी देखील मनोज जरांगे पाटील त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी फोनवर चर्चा केली. तसेच त्यांना सरकारच्या निर्णयाची माहिती दिली. मराठा आंदोलन तीव्र झाल्याने जरांगे पाटील आजपासून पिणार पाणी आहेत.

शाहू महाराज छत्रपती हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहेत. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्या आरोग्याची चौकशी केली. या वेळी त्यांनी सरकारला आपली मागणी मान्य करावीच लागणार असल्याचे म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी देखील अर्धवट आरक्षण घेणार नसल्याचे महाराजांना सांगितले. काल झालेल्या जाळपोळीबातही शाहू महाराज यांनी भाष्य केले. काल जास्तच जाळपोळ झाली असल्याचे ते म्हणाले. मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र झाले आहे. त्यामुळे राज्य सरकार मधील हालचालींना देखील वेग आला आहे. काल मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतील निर्णयांची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आज फोन केला. त्यांच्याशी फोनवर चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम