पाटलांनी केली मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा ; आज पासून पिणार पाणी !
बातमीदार | ३१ ऑक्टोबर २०२३
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या सहा दिवसापासून उपोषण सुरु केलेले मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली आहे. तसेच त्यांना सरकारच्या निर्णयाची माहिती दिली. संपूर्ण राज्यात मराठा समाज आक्रमक झाला तर काही ठिकाणी हिंसक वळण देखील लागले आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत कुणबी नोंदी असणाऱ्या मराठ्यांना आरक्षण देण्याची सुरुवात करणार असल्याची घोषणा केली आहे. तरी देखील मनोज जरांगे पाटील त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. या संदर्भात आज मनोज जरांगे पाटील पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. तसेच मराठा आंदोलन तीव्र झाल्याने जरांगे पाटील आजपासून पिणार पाणी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चर्चा झाली. या चर्चेदरम्यान अर्धवट आरक्षण नको, तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा अभ्यासकांसोबत चर्चा करणार आहेत. तसेच त्या नंतर पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत. मनोज जरांग पाटील हे आधी तज्ज्ञांशी आणि नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याची चर्चा करणार आहेत. त्या नंतर त्यांच्यात झालेल्या चर्चेची माहिती ते पत्रकार परिषदेत देणार आहेत. आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये काय निर्णय होतो, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम