एआयएमआयएम प्रमुखांच्या घरावर चौथ्यादा हल्ला !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० फेब्रुवारी २०२३ । ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीनचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हरियाणातील मुस्लिम तरुणांच्या हत्येवरून भाजप व संघावर निशाणा साधल्यानंतर एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील घरावर दगडफेक झाली. ओवेसी यांनी पहाटे 1 वाजता त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ ट्विट केला.

ज्यात त्यांनी लिहिले आहे की, माझ्या दिल्लीतील घरावर पुन्हा एकदा हल्ला झाला आहे. 2014 नंतरची ही चौथी घटना आहे. याआधी मी जयपूरहून परत आलो आणि माझ्या घरातील नोकराने मला सांगितले की, झुंडीने दगडफेक केली, ज्यामुळे खिडक्यांच्या काचा फुटल्या. दिल्ली पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक करावी. ही घटना चिंताजनक आहे. हाय सिक्युरिटी असलेल्या भागात ही घटना घडली आहे. याबाबत पोलिसांना माहिती दिल्याचे ओवेसी यांनी सांगितले.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीनचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हरियाणातील मुस्लिम तरुणांच्या हत्येवरून भाजप व संघावर निशाणा साधला आहे. जुनैद व नासिरची हत्या हरियाणातील गो-रक्षकांच्या नावाने सुरू असलेल्या एका संघटित टोळीने केली आहे. या हत्याकांडात सहभागी मोनू मानेसर व त्याच्या सहकाऱ्यांना भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा खुला पाठिंबा आहे, असे ते म्हणालेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम