SBI क्रेडीट कार्ड वापरत आहात ; इतका लागणार खर्च !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० फेब्रुवारी २०२३ । आपल्याला नेहमी फोनद्वारे प्रत्येक बँकेतून फोन येत असतात व ते आपापल्या बँकेतील क्रेडीट कार्डची माहिती देवून क्रेडीट कार्ड घेण्यासाठी आपल्याला सांगत असतात जर तुमच्याकडे या बँकेची कार्ड असेल तर तुमच्यासाठी हि बातमी महत्वाची आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड वापरत असाल, बँकेने आपल्या क्रेडिट कार्डधारकांना ईमेल पाठवून नवीन चार्जेजविषयी माहिती दिली आहे.

या ईमेलनुसार, यापूर्वी क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यासाठी 99 रुपये प्रोसेसिंग फी होते. आता ती दुप्पट करण्यात आली आहे. 17 मार्च 2023 पासून बँकेने ती 199 रुपये केली आहे. तसेच जीएसटी चार्जेस वेगळे आकारले जाणार आहेत.

SBI किती चार्ज घेते?
SBI कार्डच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 15 नोव्हेंबर 2022 रोजी बँकेने रेंट पेमेंटवर 99 रुपये ट्रांझेक्शन चार्ज आकारले. याशिवाय 18 टक्के जीएसटी स्वतंत्रपणे आकारला जातो. वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, मर्चेंट ईएमआय ट्रांझेक्शन चार्ज देखील 15 नोव्हेंबर रोजी 99 रुपयांवरून 199 रुपये करण्यात आले होते. GST स्वतंत्रपणे आकारला जातो.

HDFC बँक किती चार्ज आकारते?
SBI व्यतिरिक्त, इतर अनेक बँका आहेत ज्या त्यांच्या ग्राहकांना क्रेडिट कार्डद्वारे रेंट पेमेंट करण्याची सुविधा प्रदान करतात. HDFC बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, तुम्हाला HDFC क्रेडिट कार्डच्या मदतीने भाडे जमा करण्यापूर्वी 45-50 दिवसांचा इंटरेस्ट फ्री क्रेडिट पीरियड मिळतो. HDFC बँक रेंटल अमाउंटच्या 1% चार्ज आकारते जो दुसऱ्या महिन्यापासून लागू होते.

ICIC बँक किती चार्ज आकारते?
ICIC बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही ICICI क्रेडिट कार्डच्या मदतीने भाडे भरले तर ते देखील भाड्याच्या रकमेच्या 1% असेल. ऑक्टोबर 2022 पासून बँकेने ही सुविधा सुरू केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम