दारणा नदीत पतीचा बुडून मृत्यू

बातमी शेअर करा...

इगतपुरी तालुक्यातील बोर्ली वाघ्याची वाडी येथे दारणा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या दाम्पत्यांपैकी पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

३१ मे रोजी दुपारी पुनाजी नामा वीर आणि त्यांची पत्नी सखुबाई वीर दारणा नदीत आंघोळीसाठी गेले होते. आंघोळीदरम्यान पुनाजी वीर पोहत असताना बुडाले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिकांच्या मदतीने पुनाजी वीर यांचा मृतदेह नदीतून बाहेर काढला. पुढील तपासणीसाठी मृतदेह इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम