
फडणवीसांनी लिहलेली स्क्रिप्ट अजित दादांनी वाचली ; सुषमा अंधारेंची हल्लाबोल !
दै. बातमीदार । १९ एप्रिल २०२३ । राज्यात गेल्या आठ दिवसापासून राजकारणात मोठा भूकंप होईल अशा बातम्या येवू लागल्या होत्या पण नंतर अजित पवार माध्यमासमोर आपली भूमिका मांडल्यानंतर त्या बातम्या थांबल्या आहे पण आता ठाकरे गटाचे नेत्या अंधारे यांनी भाजपसह शिंदे गटावर तुफान हल्लाबोल केला आहे.
अजित पवार आजही भाजपच्या वाटेवर आहेत, अशाही चर्चा रंगल्या. त्यावर आता अजित पवारांनी स्पष्टोक्तीही दिली, पण मुळातः प्रश्न हा की, या चर्चाची सुरुवात कुठून झाली. त्याची अनेक कारणेही समोर आली आहेत. अजित पवार यांनी 8 एप्रिलरोजी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, असा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला होता. मात्र काल अजितदादांनी आपण जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवारांवरुन सुरु असलेल्या संपूर्ण चर्चांवरुन वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यप्रकरणी सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. सुषमा अंधारे कोल्हापुरात बोलताना म्हणाल्या, अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे. शिंदे गटाचे स्टेटमेंट पाहता ही लोक तंबाखूचा बार भरून बोलतात, असे वाटते.
सुषमा अंधारे म्हणाल्या, अजितदादांची स्क्रिप्ट भाजपकडून लिहली गेली आहे. वज्रमुठ सभेला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर भाजप कडून हे केले जात आहे. फडणवीस यांचे मौनच सगळे सांगून जाते. या खेळाचे स्क्रिप्ट रायटर हे फडणवीस आहेत. अध्यात्माचे राजकारण कसे करता येईल, यासाठी शिंदे सरकारचा प्रयत्न सुरु असल्याची टीका अंधारे यांनी केली. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्या, शहा मतांचे राजकारण करण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. लाखो लोकांसमोर आपण असलो पाहिजे, असा अट्टहास त्यांनी धरला होता. मात्र, त्यानंतर मृतकांच्या घरी किंवा रुग्णालयात जाऊन विचारपूस करण्याची मानवतादेखील अमित शहांनी दाखवली नाही, असा टोला त्यांनी लगावला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम