
दै. बातमीदार । १९ एप्रिल २०२३ । देशात कधी कधी अशा काही विचित्र घटना ऐकू येतात की त्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण होतं. पण त्या गोष्टी खऱ्या असतात. आता हेच पाहा नाही. हि घटना उन्नाव जिल्ह्यातील सफीपूर कोतवाली येथील आहे.
जेथे एका महिलेला साप चावला, मात्र तिला हॉस्पिटलला घेऊन जाण्याऐवजी तिचा नवरा सापाला रुग्णालयात घेऊन घेला. हो हे खरं आहे. आता हे सगळं ऐकून तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की, त्याने असे का केलं असावं? पण या सापाला दवाखान्यात नेण्यामागे माणसाणे सांगितलेला तर्क तुम्हाला थक्क करेल.
उन्नाव जिल्ह्यातील सफीपूर कोतवाली भागातील उमर अटवा गावात ही घटना घडली येथील रहिवासी नरेंद्र नावाच्या व्यक्तीने गोणीत भरुन सापाला हॉस्पिटलमध्ये नेले आणि नक्की काय घडलं त्याने संपूर्ण प्रकरण डॉक्टरांना सांगितले. वास्तविक, या व्यक्तीची बायको कुसमा काम करत असताना तिला साप चावला. साप चावल्यानंतर महिला आरडाओरडा करून बेशुद्ध पडली. घाईघाईत महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
यानंतर तिच्या नवऱ्याला या दुर्दैवी घटनेची माहिती देण्यात आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो माणूस आपल्या पत्नीला भेटायला हॉस्पिटलमध्ये आला नाही. त्याऐवजी तो घरी गेला, त्याने साप पकडले आणि रुग्णालयात घेऊन आला. सापाला पाहून रुग्णालयातील डॉक्टर आश्चर्यचकीत झाले आणि त्यांनी त्या व्यक्तीला सापाला रुग्णालयात का आणले?
याबद्दल विचारणा केली. खरंच नागाला मारल्यावर नागीण बदला घेते? सापांसंबंधीत काही मान्यता आणि सत्य या व्यक्तीचं असं म्हणणं होतं ही सर्पदंशाच्या आधारे त्याला त्याच्या बायकोवर उपचार हवेत, त्यामुळे तिला कोणता साप चावला आणि त्याचं विष किती धोकादायक असू शकतं, या आधारे त्याच्या बायकोची ट्रिटमेंट व्हावी, असं त्याला वाटत होतं. त्यानंतर आता महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले. अशीच एक घटना माखी पोलीस स्टेशन भागात घडली. वृत्तानुसार, पती साप आणि जखमी पत्नीसह रुग्णालयात आला. नवरा डॉक्टरांना म्हणाला, “माझ्या बायकोला कोणता साप चावला आहे असं तुम्ही विचारलत तर? म्हणून मग मी सापच घेऊन आलो आहे, जेणेकरुन तुम्ही स्वतः पाहू शकता आणि माझ्या बायकोवर बरोबर आणि लवकर उपचार होतील.”

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम