अजित पवार लागलीच आजारी पडतात ; मनोज जरांगे पाटलांच्या मुलीची सडकून टीका !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३० ऑक्टोबर २०२३

राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही दिवसापासून जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी याठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे तर याठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार येणार होते. यावेळी मात्र अजित पवार आजारी पडले असल्याने जरांगे पाटील यांची मुलगी पल्लवी जरांगेने अजित पवारांवर टीका केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबीयांनी काल माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जरांगे पाटील यांच्या मुलीने सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका केली. पल्ली जरांगे म्हणाली, सरकार म्हणते आम्ही आरक्षणासंदर्भात कटिबद्ध आहोत, पण कधीपर्यंत कटिबद्ध असणार आहे? पप्पांची तब्येत खालावली आहे हे समजल्यावर माझी मम्मी रडते, तर आम्हालासुद्धा रडू येते. उपमुख्यमंत्री अजित पवार आंतरवाली सराटीत येणार होते. पण त्यांना आता डेंग्यू झाला आहे, बाकीच्या कार्यक्रमांना ते जातात पण मराठा आरक्षणाचा विषय म्हटले की ते लगेच आजारी पडतात.

पुढे पल्लवी जरांगे म्हणाली, माझ्या वडिलांची तब्येत खराब झाली आहे. मला आमच्या परिवारामध्ये आजोबांची, आईची घालमेल दिसत आहे. माझे पप्पा गेल्या दोन महिन्यांपासून घरी आलेले नाहीत आणि आम्ही उपोषणस्थळी जात नाही किंवा फोनही करीत नाहीत. कारण फोन केला तर ते भावनिक होतात. त्यामुळे उपोषणावर त्याचा परिणाम होतो. ते होऊ नये म्हणून आम्ही तिकडे जात नाही किंवा फोनही करीत नाहीत. मात्र आमच्या वडिलांच्या लढाईला आमचा पाठिंबा आहे. डॉ. म्हणतात पप्पांनी उपोषण करू नये. मात्र, मराठा समाजासाठी ते उपोषण करतात. त्यांना आमच्या परिवाराचा पाठिंबा आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम