अजित पवार मध्यरात्री पोहचले सिल्व्हर ओकवर !
दै. बातमीदार । १५ जुलै २०२३ । राज्यातील मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस व अजित पवारांच्या नेतृत्वात नुकतेच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाते वाटप करण्यात येत असतांना दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर रात्रीच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी काल अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे एकत्र आले होते. प्रतिभा पाटील यांना दुखापत झाल्यानं त्यांची विचारपूस करण्यासाठी अजितदादांनी ही भेट घेतली. पण यावेळी या तिघांमध्ये काय चर्चा झाली? याबाबत खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे.
अजित पवार म्हणाले, “काल काकींचं एक ऑपरेशन झालं होतं, त्यांच्या हाताला थोडी दुखापत झाली आहे. त्यामुळं मला दुपारीच जायचं होतं, ऑपरेशन झाल्या झाल्या. पण मला थोडा विलंब झाला कारण बरंच काम होतं. नंतर मी फोन केला तर सुप्रिया सुळेंनी मला सांगितलं की, आम्ही सिल्व्हर ओकला चाललोय. तुझं काम झाल्यावर तू सिल्व्हर ओकलाच ये.
मला काकींना भेटायचचं होतं. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी. आपल्या भारतीय संस्कृतीत कुटुंबाला महत्व देत असतो. सहाजिकचं आमच्या पवार कुटुंबियांनी आम्हाला हे शिकवलं आहे. त्यामुळं मी काकींना भेटलो अर्धातास तिथं होतो. त्यांची खुशहाली विचारली. त्यांना आणखी २१ दिवसांची विश्रांती घेण्यास डॉक्टरांनी सांगितलं आहे” त्यावेळी तिथं पवार साहेब होते, सुप्रिया तिथं होती आणि काकीही होत्या. मधल्या काळात ज्या काही घडामोडी घडल्या त्याबाबत आमची चर्चा झाली नाही. पण पवार साहेबांनी शिक्षण क्षेत्राबाबत मला एक पत्र दिलं. याची एक कॉपी मला मिळाली एक कॉपी फडणवीसांकडं गेली आहे. याबाबत मी कालच याबाबत थोडीशी माहिती घेतली. हे प्रकरण २१-२२ मधलं होतं. यामध्ये महाराष्ट्र शिक्षणाच्याबाबतीत आपण २ क्रमांकावरुन ७ व्या क्रमांकावर गेलो आहोत. त्यामध्ये काही सुधारणा कराव्या लागतील, त्यादृष्टीनं काम केलं जात आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम