अजित पवारांनी काकासमोर येणे टाळले ; वाचा सविस्तर !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | १६ सप्टेंबर २०२३ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या त्रैमासिक सभेत होईल, असे वाटत असताना अजित पवार यांनी बैठकीला ऐन वेळी दांडी मारली. अजित पवारांच्या या अनुपस्थितीची चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात होती.

‘व्हीएसआय’च्या व्यासपीठावर राजकीय अभिनिवेश नसतो. अजित पवार यांना अन्य ठिकाणी जायचे असेल, त्यामुळे ते आले नसावेत, अशी सारवासारव जयंत पाटील यांनी केली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियमित तिमाही बैठकीसाठी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपाध्यक्ष दिलीप वळसे- पाटील, कार्यकारिणी सदस्य, उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र येणार होते. पण, अजित पवारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. इतर सर्व मान्यवरांची उपस्थिती होती.अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर ते व्हीएसआय येथील बैठकीस उपस्थित राहतील, असे बोलले जात असतानाच त्यांनी शरद पवार यांच्यासोबत बैठकीला उपस्थित राहण्याचे टाळले. मार्केट यार्ड येथील कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी थेट दौंड गाठल्याची चर्चा होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम