शाहरुखच्या ‘जवान’ वर भाजपसह आप देखील फिदा !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | १६ सप्टेंबर २०२३ | सुपरस्टार शाहरुख खान यांच्या जवान या चित्रपटावर प्रेक्षकांबरोबरच आप व भाजप हे पक्षही फिदा झाले आहेत. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने मोठा व्यवसाय केला आहे. त्याचबरोबर हा चित्रपट लोकांनी आवर्जून बघावा असे आप भाजप आवर्जून सांगत आहेत.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता गौरव भाटिया यांनी म्हटले की, जवान चित्रपटाच्या माध्यमातून २००४ ते २०१४ या कालावधीतील भ्रष्ट यूपीए सरकारचा खरा चेहरा दाखविल्याबद्दल शाहरुख खान यांना धन्यवाद दिले पाहिजेत. आपने म्हटले की, जवान चित्रपटामध्ये शाहरूख खान यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत, ते प्रश्न आम्ही आधीपासून जनतेसमोर मांडत आहोत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, जनतेकडे मते मागणाऱ्या पक्षांबद्दल शाहरुख यांनी जवानमध्ये काही प्रश्न विचारले आहेत. पण मी त्यांना आवर्जून सांगू इच्छितो की, देशातील आप हा असा एकमेव पक्ष आहे की, जो लोकांना शिक्षण, आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळाव्या यासाठी विशेष प्रयत्न करतो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम