अजित पवार गटाची शरद पवारांवर जोरदार टीका !
बातमीदार | २१ ऑगस्ट २०२३ | राज्यातील ठाकरेंची शिवसेनेला खिंडार देवून बाहेर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देखील मोठ भगदाड पाडून अजित पवार सत्तेत विराजमान झाले असून आता अजित पवारांच्या गटातील मंत्र्यांनी थेट शरद पवारांवर टीका केली आहे.
अजित पवार गटासोबत सत्तेत सहभागी झालेले दिलीप वळसे-पाटील यांनी प्रथमच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांवर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही असे आपण म्हणतो परंतु महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार यांना एकदाही बहुमत दिले नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आले नाही, अशी घणाघाती टीका दिलीप वळसे-पाटील यांनी केली आहे.
रविवारी पुण्यातील मंचर येथील जाहीर कार्यक्रमात दिलीप वळसे-पाटील यांनी हि टीका केली आहे. ते म्हणाले कि, शरद पवार हेच आमचे नेत व गुरू असल्याचे ते सांगत होते. मात्र, अचानक दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवारांवर एवढ्या प्रखर शब्दांत टीका केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच, आतापर्यंत शरद पवारांविषयी अत्यंत आदाराने बोलणारे दिलीप वळसे-पाटील का बोलले? याचीही चर्चा आता रंगू लागली आहे. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता आले नाही. देशातील अनेक राज्यातील प्रादेशिक पक्ष पाहिले तर ते पुढे जात आहेत. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. आपल्याकडे शरद पवारांसारखे नेते आहेत. मात्र, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आपले (राष्ट्रवादीचे) फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात. नंतर कोणाशी तरी आघाडी करावी लागते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम