‘हार्ट ऑफ स्टोन’मध्ये आलियाने स्वीकारला नवी भूमिका !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ जून २०२३ ।  नेहमीच आपल्या वेगवेळ्या लुकमुळे चर्चेत असलेली आलिया भट सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते. आलिया भट बस नाम ही काफी है! स्टारकिड, नेपोटिझम असे सर्व टोमणे न ऐकता या छोट्या पॅकेटने बडा धमाका केलाय. अभिनयात पदार्पणानंतर आलियाने १० वर्षांतच बॉलिवूड तर गाजवलंच आता ती हॉलिवूडमध्येही उतरली आहे. आलियाचा पहिला हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

पहिल्याच हॉलिवूड सिनेमात आलियाला थोडीथोडकी नाही तर थेट व्हिलनची भूमिका साकारायला मिळाली आहे. हॉलिवूडची ‘वंडर वुमन’ गॅल गॅडोटसोबत ती स्क्रीन शेअर करत आहे, तर ‘५० शेड्स ऑफ ग्रे फेम अभिनेता जेमी डॉर्नन देखील मुख्य भूमिकेत आहे. ‘हार्ट ऑफ स्टोन’ एक स्पाय थ्रिलर सिनेमा आहे. यामध्ये गॅल गॅडोट खतरनाक स्टंट्स करताना दिसते. ती एक सिक्रेट एजंटची भूमिका साकारत आहे. आपलं मिशन पूर्ण करण्यासाठी ती कोणकोणत्या गोष्टींचा सामना करते हे दाखवण्यात आलं आहे. तोच तिच्यासमोर व्हिलनच्या रूपात आलिया भट उभी आहे. याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. आलिया भटने सोशल मीडियावर ट्रेलर शेअर केला असून ‘हार्ट ऑफ स्टोन ऑगस्ट ११’ अशी कॅप्शन दिली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम