इम्रान हाश्मी करणार तेलगु चित्रपटात काम !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ जून २०२३ ।  गेल्या अनेक वर्षापासून ‘सिरियल किसर’ म्हणून ओळखला जाणारा इम्रान हाश्मी अलीकडच्या काळात खूपच चूझी बनला आहे. तोलून मापून सिनेमे साइन करणारा इम्रान लवकरच दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे. दिग्दर्शक सुजितचा ‘ओजी’ हा गँगस्टर ड्रामा घोषणा झाल्यापासून चर्चेत आहे. बहुप्रतिक्षित आगामी चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘ओजी’मध्ये दक्षिणेकडील पॉवरस्टार पवन कल्याण मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचं शूटिंग सध्या प्रगतीपथावर असून, काही भाग मुंबईत शूट करण्यात आला आहे.

लवकरच पुढील शूटिंग शेड्यूलसाठी ‘ओजी’ची टिम हैदराबादला रवाना होणार असल्याचं समजतं. यात इम्रान हाश्मीही दिसणार असल्याची माहिती मिळाली आहे. या तेलुगू चित्रपटात इम्रान नेमेसिसच्या भूमिकेत दिसणार आहे. या निमित्ताने इम्रान तेलुगू सिनेसृष्टीत दाखल होणार आहे. पवन कल्याण, सुजित, दानय्या आणि टीमसोबत काम करण्यास उत्सुक असल्याची भावना इम्रानने व्यक्त केली आहे. या चित्रपटात श्रीया रेड्डी मुख्य भूमिका साकारणार असल्याची अधिकृत घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. यात प्रकाश राजही दिसणार आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम