तलवार घेवुन दहशत माजविणा-यास अमळनेर पोलीसांनी केली अटक.

बातमी शेअर करा...

अमळनेर (आबिद शेख)
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे, अमळनेर पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, अमळनेर शहरातील जुना पारधीवाडा भागातील राहणारा राजेश उर्फ दादु एकनाथ निकुंभ हा अमळनेर शहरातील सुभाष चौक भागात हातात धारदार तलावर घेवुन दहशत माजवित फिरत आहे, त्यावरुन पोहेकाँ कपिलदेव पाटील, पोना. मिलींद भामरे, पोना. लक्ष्मीकांत शिंपी, पोना सुर्यकांत साळुंखे अशांना नमुद इसमास ताब्यात घेणे बाबत सुचना दिल्या. त्यांनतर वरील नमुद पथक राजेश उर्फ दादु एकनाथ निकुंभ याचा शोध घेत असतांना तो पटेल कॉम्पलेक्स जवळील बोळ मध्ये एक इसम हातात तलवार घेवुन दहशत माजवित फिरत असातांना दिसला. तेव्हा त्यास वरील पोलीस स्टॉफने अत्यंत शिताफिने ताब्यात घेतले असता त्यांच्या ताब्यात १ ) एक धारदार पात्याची स्टीलची तलावर २) एक लाकडी मुठीचा चाकु (आरोपी राजेश उर्फ दादु निकुभ याचे कमरेस लावलेला) असे मिळुन आले आहे.

वरील ताब्यात घेतलेले इसमाचे नाव राजेश उर्फ दादु एकनाथ निकुंभ रा. जुना पारधीवाडा, अमळनेर यांचे वर अमळनेर पोलीस स्टेशन गु.र.न. ५६६ / २०२२ शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४/२५ सह मु.पो. का. क. १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सफौ. रामकृष्ण कुमावत हे करीत आहे. नमुद अटक अरोपीताचा पुर्व इतिहास पाहता तो अमळनेर पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. एम. रामकुमार सो., मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. रमेश चोपडे सो. मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. राकेश जाधव सो यांच्या सुचनेप्रमाणे व पो.नि.श्री. विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाने पोहेकॉ. कपिलदेव पाटील, पोना. मिलींद भामरे, पोना. लक्ष्मीकांत शिंपी, पोना. सुर्यकांत साळुंखे अश्यांच्या पथकाने केली आहे..

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम