आजचे राशिभविष्य दि ९ डिसेंबर २०२२

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ डिसेंबर २०२२ ।  मेष- कौटुंबिक समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. अनावश्यक खाचा टाळा. भूतकाळात रममाण व्हाल

वृषभ– लांबच्या प्रवासाचा योग असणार आहे. रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. जबाबदारीचे काम हाताळायला मिळेल.

मिथुन– आजच्या दिवशी तुम्ही नात्यांमध्ये सावध राहिलं पाहिजे. व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्याचा फायदा होणार आहे. कोणाशीही भांडण करू नका.

कर्क- जेष्ठांचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन घ्या. जुनी इच्छा पूर्ण होणार आहे. नातेसंबंध सुधारू शकतात.

सिंह- घरामध्ये आज सकारात्मकता नांदणार आहे. घरातील मोठ्याच्या आशिर्वादानं पुढे जाण्याची तुम्हाला चांगली संधी आहे.

कन्या- आज तुमच्या व्यवसायामध्ये भरभराट होणार आहे. जोडीदाराच्या आरोग्यात सुधारणा होणार आहे मात्र तरीही काळजी घ्यावी. बचतीला प्राधान्य द्यावे.

तूळ- अचानक दुखापत होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचा आदर करा. अडकलेले काम मार्गी लागेल.

वृश्चिक– आज तुम्हाला सकाळी सकाळी चांगली बातमी कळणार आहे. आजच्या दिवशी तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी सांभाळा. मित्रांची साथ लाभणार आहे.

धनु– कामाच्या ठिकाणी तुम्ही स्तुतीस पात्र ठरेल. भाग्य तुमच्या सोबत असणार आहे. कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल.

मकर– आजच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवा. तुमच्या घरातल्या व्यक्तींची मनं ओळखायला शिका. नोकरीच्या निमित्ताने प्रवास होऊ शकतो.

कुंभ– आजच्या दिवशी नोकरीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेऊ नका. उधार दिलेले पैसे परत मिळणार आहेत.

मीन- या राशीच्या व्यक्तींना जवळच्या व्यक्तीकडून भेटवस्तू मिळू शकते. गुंतवणूक करता विचारपूर्वक करा.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम