पाचोऱ्यात ५५ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

पाचोऱ्यातील पांडव नगरीत ५५ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

बातमी शेअर करा...

पाचोरा: शहरातील भडगाव रोडवरील पांडव नगरी येथे ५५ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २६ मे रोजी सकाळी ११ वाजता उघडकीस आली आहे. या घटनेची नोंद पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

पांडव नगरीत राहणारे राजु लुकडु पाटील (वय ५५) यांनी आपल्या घरातील छताला गळफास लावून आत्महत्या केली. तातडीने त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. राजु पाटील टेलरिंगचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आणि एक मुलगी असा परिवार आहे.

राजु पाटील यांनी आत्महत्या केली त्यावेळी घरात कोणीही नव्हते. त्यांच्या पत्नी व मुले भोपालला नातेवाईकांकडे खाजगी कार्यक्रमासाठी गेले होते. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम