
दै. बातमीदार । १५ फेब्रुवारी २०२३ । देशात आपल्या वेगवेगळ्या अभिनयातून नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे प्रियंका चोप्रा हि बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी आघाडीची अभिनेत्री आहे. प्रियांकाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सिनेमे देणारी अभिनेत्री प्रियांका आता हॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.
प्रियांकाचा ‘लव्ह अगेन’ हा आगामी हॉलिवूड सिनेमे पुढील काही महिन्यात चित्रपटगृहात येऊन धडकणार आहे. यापूर्वी रोमँटिक कॉमेडी सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात प्रियांकासोबतच हॉलिवूड अभिनेता सॅम ह्युगन दिसणार आहे. प्रियांकाच्या या सिनेमात तिचा पती आणि गायक निक जोनास हादेखील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘लव्ह अगेन’ सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की, मीरा म्हणजेच प्रियांका तिच्या बॉयफ्रेंडच्या मृत्यूनंतर आयुष्यात पुढे जाण्यासाठी संघर्ष करत आहे. ती जुन्या नंबरवर मेसेज पाठवत असते, जो आता रॉब बर्न्स म्हणजेच सॅम ह्युगन वापरत आहे. रॉब हा एक पत्रकार आहे, जो मीराचा प्रामाणिकपणा आणि तिच्या मेसेजद्वारे तिच्याकडे आकर्षित होतो. तसेच, तो मीराच्या प्रेमातही पडतो.
अशाप्रकारे कथा पुढे जाते. प्रियांकाने ‘लव्ह अगेन’चा ट्रेलर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आम्ही हा सिनेमा खूपच कठीण काळात बनवला आहे. अधिकतर वेळ आम्ही कुटुंबापासून दूर राहिलो आहे. मात्र, सेटवर प्रत्येक दिवस खास होता. खासकरून या स्टारकास्टसोबत.”

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम