
संजय राऊत यांचे सूचक विधान; महाविकास आघाडीत पडू शकते फुट?
दै. बातमीदार । १८ नोव्हेबर २०२२ भारत जोडो यात्रेचे राहुल गांधी नेतृत्व करीत आहे तर यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात तर अधिक प्रतिसाद मिळाला. महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरून ही यात्रा सुरू आहे. मात्र या यात्रेत सावरकरांचा मुद्दा काढण्याची काहीच गरज नव्हती. या मुद्द्यामुळे केवळ शिवसेनेलाच नव्हे तर काँग्रेसलाही धक्का बसला आहे. काँग्रेसच्याही अनेक नेत्यांची अडचण झाली आहे. इतिहासात काय घडलं, याकडे लक्ष देण्यापेक्षा राहुल गांधी यांनी नवा इतिहास निर्माण करण्याकडे लक्ष द्यावं. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतही फूट पडू शकते, असं मोठ विधान संजय राऊत यांनी केल आहे.
आज सकाळी संजय राऊत माध्यमांशी बोलताना त्यांनी आपण राहुल गांधींच्या विधानाशी सहमत नसल्याचं स्पष्ट केलं. तक्रारी दाखल करणे आणि प्रसिद्धी मिळवणे असा राजकीय उद्योग आपल्या देशात चालू आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतिहासकाळात काय घडलं आणि काय नाही घडलं यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा या मताचे आम्ही आहोत. राहुल गांधींनी त्याकडं लक्ष द्याव असं राऊत यावेळी म्हणाले. राहुल गांधींच्या सावरकरांविषयीच्या वक्तव्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले, “बेरोजगारी, महागाई असे मुद्दे भारत जोडो यात्रेत असताना अचानक राहुल गांधींनी सावरकरांचा विषय का काढला? सावरकर कधीच भाजपा आणि संघाचे आदर्श पुरुष नव्हते. त्यांचे आयडॉल्स वेगळेच होते. भाजपाचे सावरकर प्रेम नकली आणि ढोंगी आहे असे देखील राऊत यावेळी म्हणाले.
अकोला जिल्ह्यात राहुल गांधींनी भाषण दिलं. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले होते की, सावरकर हे भाजप-आरएसएसचे प्रतीक आहेत. ते दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यांनी दयेचे अर्ज लिहायला सुरुवात केली. राहुल गांधींनी असा दावा केला होता की, सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वतःवर एक पुस्तक लिहिले आणि ते किती शूर होते हे सांगितले. ते म्हणाले, “ते इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे, त्यांच्यासाठी काम करायचे आणि काँग्रेसच्या विरोधात काम करायचे.” असं वक्तव्य केल्यामुळे राहुल गांधींवर टीका होतेय.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम