सावरकर यांच्या विरोधात बोलणे खपवून घेणार नाही ; बावनकुळे

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ नोव्हेबर २०२२ देशात सुरु असलेल्या यात्रेनिमित राहुल गांधी राज्यात येवून थांबले असून हि यात्रा आम्ही पहिल्याच दिवशी थांबविली असती मात्र आम्हाला त्याच्यात रस नाही. महाराष्ट्रात येऊन वीर सावरकर यांच्याविरोधात बोलणे आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींना दिला आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी असल्याचेही यावेळी ते म्हणाले.

BJP add

पुढे बावनकुळे म्हणाले, राहुल गांधी यांच्या वक्तव्याने देशाची मान खाली गेली आहे. वीर सावरकरांबद्दल राहुल गांधी आक्षेपार्ह वक्तव्य करत आहे. काँग्रेस पार्टी (INC) त्याचं समर्थन करत आहे. राहुल गांधी यांना सावरकरांचा इतिहास माहित असूनही ते जाणूनबुजून तो इतिहास दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. चुकीचे वक्तव्य केल्यामुळे देशात त्यांच्याबद्दल घृणा निर्माण होत आहे. देश राहुल गांधी यांना माफ करणार नाही. राहुल गांधींनी या यात्रेतून जे काही एक-दोन टक्के समर्थन कमावलं होतं तो या वक्तव्याने गमावला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम