अनन्या पांडे आणि आदित्य आले एकत्र; नेटकऱ्यांनी विचारले प्रश्न
दै. बातमीदार । २१ ऑक्टोबर २०२२ । गुरुवारी मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांची नावे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. पण या चर्चेचं कारण काही वेगळं आहे. ही चर्चा त्यांच्या चित्रपटांबद्दल नाही तर त्यांच्या नवीन नात्याबद्दल होते आहे. हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जात आहे. याची प्रचिती नुकतीच एका दिवाळी पार्टीत आली.
याचं ताजं उदाहरण म्हणजे रमेश तौरानीच्या दिवाळी पार्टीचे काही फोटो समोर आले होते ज्यात दोघे एकमेकांसोबत लव्ह बर्ड सारखे दिसत होते. इतकेच नाही तर गुरुवारी मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीमध्ये पण एकत्र होते. ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे यादरम्यान आदित्य आणि अनन्या जवळपास एकाच वेळी आले आणि त्यानंतर दोघांनी एकत्र फोटो क्लिक केले. प्रेमाचा रंग लाल असतो असे म्हणतात पण यावेळी दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. दोघेही मॅचिंग लुकमध्ये एकमेकांना परफेक्ट शोभेल असे दिसत होते.
आता दोघांचे एकत्र फोटो आणि व्हिडीओ पाहता, दोघांनी एक प्रकारे त्यांच्या नात्याबाबत पुष्टी दिली आहे की काय? असा अंदाज वर्तवला जात आहे. गेली काही दिवस ते दोघेही नात्यात असल्याची चर्चा होती. आता अशा पद्धतीने एकत्र येणं ही त्याच प्रेमाची कबुली म्हणायची का? असे नेटकऱ्यांना वाटते.,
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम