खा. राऊत यांची दिवाळी तुरुंगातच?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ ऑक्टोबर २०२२ । महाविकास आघाडी घडवून मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेंना विराजमान करणारे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे. पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी ते सध्या ईडी कोठडीत आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे. संजय राऊत यांना दिवाळीपूर्वी जामीन मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, तूर्तास तरी त्यांना दिलासा मिळालेला नाही.

संजय राऊतांच्या वकिलांनी आज कोर्टात युक्तिवाद केला. पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीने आरोप केले आहेत. मात्र, त्याचा कुठलाही संबंध थेट राऊत यांच्याशी लागत नाही. प्रवीण राऊतांना मिळालेले पैसे पीएमसी बँकेसंबंधात होते. त्याच्याशी संजय राऊत यांचा काहीही संबंध नव्हता. मात्र, त्यांची प्रॉपर्टी जप्त केली. त्याचे कारण काय, असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.

प्रवीण राऊत यांच्याकडून खात्यावर पैसे जमा झाले. याचा अर्थ ते गैरव्यवहारासंबंधात आहेत, असे कसे म्हणता येईल. हे पैसे अनेकांनी स्वीकारले. यातल्या दोन व्यक्तींनी पैसे दिले आहेत. मात्र, ते कुठे आहेत, असा सवालही वकिलांनी केला. सध्याच्या या प्रकरणात पैसे दिले आहेत. मात्र, हे पैसे कोण आणि कुणाला दिले हे स्पष्ट होत नाही. प्रत्येकजण एकमेकांकडे बोट दाखवत आहे. त्यांच्या जबाबात सारखेपणा नाही. विशेष म्हणते ते आपल्या म्हणण्यावर ठाम नाहीत. सारखा जबाब बदलत आहेत. त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा, असा सवालही वकिलांनी केला.
स्वप्ना पाटकर आपल्या जबाबाबत कुणालाही भेटले नाही म्हणतात, तर सुजीत पाटकर हे व्यवहार स्वप्ना पाटकरांच्या कार्यालयात झाल्याचे सांगतात. त्यातही पुढे हे व्यवहार स्वप्ना पाटकरांनी केल्याचे ते म्हणतात. हा मुद्दाही राऊत यांच्या वकिलांनी उपस्थित केला.आता न्यायालयाने दोन नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम