सौ. रजनीताई देशमुख महाविद्यालयात स्व. ओंकारआप्पा वाघ यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

advt office
बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय ओंकारआप्पा वाघ यांच्या स्मृतिदिनानिमित्त सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम ओंकारआप्पा वाघ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयात ‘खानदेशचा ढाण्या वाघ : ओंकारआप्पा वाघ’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रिना शिवाजी महाजन हिने पटकावला. द्वितीय क्रमांक तनुजा देविदास महाजन हिने तर तृतीय क्रमांक भावना रोहिदास बोरसे याने प्राप्त केला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन.एन.गायकवाड हे होते. याप्रसंगी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. डी.एम. मराठे, इतिहास विभागप्रमुख डॉ. चित्रा पाटील, प्रा. देसले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.बी. एस. भालेराव यांनी केले तर प्रा.देसले यांनी उपस्थितांचे आभार मानले. सभेला बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम