दर वाढत असल्याने पेट्राेल; डिझेलचा वापर झाला कमी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ जून २०२३ ।  देशातील जनता पेट्राेल आणि डिझेलचे दर कमी हाेण्याची वाट पाहत असतांना दर कमी हाेण्याची काेणतीही चिन्हे आज देखील नसताना लाेकांनी पेट्राेल आणि डिझेलचा वापरच कमी केला आहे.

मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागताच इंधनाची मागणी घटली आहे. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात डिझेलची ६.७ टक्के तर पेट्राेलची मागणी ५.७ टक्क्यांनी घटली आहे. मे महिन्यात डिझेलची मागणी ९.३ टक्क्यांनी वाढली हाेती. दाेन्ही इंधनाची मागणी मार्च महिन्यापासून सातत्याने वाढत आहे. यामागे औद्याेगिक आणि कृषी क्षेत्रातील उलाढाल वाढल्याचे कारण हाेते. पावसाळा सुरू झाल्यानंतर डिझेलचा वापर कमी हाेताे. विशेषत: ट्रक आणि ट्रॅक्टरचा वापर कमी हाेताे.
विमानाच्या इंधनाची मागणी मे महिन्याच्या तुलनेत ३.९ टक्क्यांनी घटली आहे. जूनमध्ये २.९० लाख टन एवढी मागणी हाेती. घरगुती गॅसची विक्रीही ६.२ टक्क्यांनी घटली आहे. १ ते १५ मे या कालावधीत १२.२ लाख टन एवढी विक्री झाली. जूनमध्ये ११.४ लाख टन विक्री झाली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम