शहरात दहशतवाद विरोधी पथकाने एकास घेतले ताब्यात

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ सप्टेंबर २०२२ । शहरात भल्या पहाटे तीन जणांना दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) ने ताब्यात घेतल्यामुळे खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेहरूण परिसरात सकाळी चार वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत तीन तरुणांना अकोला एटीएस ने ताब्यात घेतले. हे तिन्ही इसम सदर परिसरातील एका मशिदीनजीक झोपले होते. ताब्यात घेतलेल्या तीन व्यक्तींपैकी दोन जणांना चौकशी करून सोडून देण्यात आले.

दरम्यान, पोलिसांच्या ताब्यात असलेला जालना येथील एक व्यक्ती मागील काही दिवसांपासून जळगाव शहरात लपून बसला होता. अब्दुल हद्दी अब्दुल रऊफ मोमीन असे या ३२ वर्षीय व्यक्तीचे नाव असून, तो जालन्यातील रहमानगंज, वरुण अपार्टमेंट येथे राहतो. धक्कादायक बाब म्हणजे सदर इसम हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या वादग्रस्त संघटनेशी संबंधित असल्याचे वृत्त समोर येत आहे.

राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ने पीएफआयचे देशभरातील कार्यालये व राज्यातील पुणे, नवी मुंबई, भिवंडी, मालेगावसह इतर ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. या छापेमारीच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम