तुम्हाला ठावूक आहे का ? माशीच्या तोंडात किती दात असतात?
बातमीदार | २४ नोव्हेबर २०२३
देशभरातील अनेक तरुण तरुणी सरकारी नोकरी मिळावे यासाठी UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तयारी करीत असतात, या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
प्रश्न. दर 2 महिन्यांनी शरीराचा कोणता भाग बदलतो?
उत्तर : माणसाचं मन दर दोन महिन्यांनी बदलतं, तर संपूर्ण शरीर बदलायला साधारण 5-7 वर्षं लागतात.
प्रश्न. कोणत्या लाकडाची किंमत सोन्यापेक्षा जास्त आहे?
उत्तर : लाल चंदन अत्यंत मौल्यवान आहे.
प्रश्न. कोणत्या देशात तुरुंगातून पळून जाण्यासाठी शिक्षा नाही?
उत्तर : जर्मनीत कैदी तुरुंगातून पळून गेल्यावर त्याला वेगळी शिक्षा दिली जात नाही, तर त्याला पकडून पुन्हा तुरुंगात आणले जाते.
प्रश्न. तापवल्यावर ती घनरूप होते, अशी कोणती गोष्ट आहे?
उत्तर : अंडं तापवलं की ते वितळण्याऐवजी घट्ट होतं.
प्रश्न. बुडल्यावर कोणी वाचवत नाही अशी कोणती गोष्ट आहे?
उत्तर: मावळतीचा सूर्य
प्रश्न. माशीच्या तोंडात किती दात असतात?
उत्तर : माशीच्या तोंडात एकही दात नसतो.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम