नेते आयोध्या जाताच ; राष्ट्रवादीने केला भाजपचा राज्यात करेक्ट कार्यक्रम !
दै. बातमीदार । ९ एप्रिल २०२३ । राज्यातील सत्ताधारी सध्या आयोध्या दौऱ्यावर असतांना राष्ट्रवादीने राज्यातील भाजपचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा आता राज्यभर सुरु झाली आहे. हा धक्का अजित पवार यांनी दिला आहे. आज अजित पवार हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पवारांच्या उपस्थितीमध्ये आज जिल्ह्यात विविध कार्यक्रम होणार आहेत.
सोबतच भाजप नेते अमित कदम यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. अजित पवार सातारा दौऱ्यावर अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज अमित कदम यांच्यासह भाजपचे शेकडो कार्यकर्ते हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. हा भाजपसाठी साताऱ्यात मोठा धक्का मानला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्तवाचा मानला जात आहे.
सातारा -जावळी मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामुळे राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं. मात्र 2019 ला त्यांनी भाजपात प्रवेश केला. यामुळे या भागात राष्ट्रवादीची ताकद कमी झाली. आता शिवेंद्रसिंहराजे यांच्याविरोधात पर्याय म्हणून अमित कदम यांच्याकडे पाहिलं जात आहे. कोण आहेत अमित कदम? अमित कदम हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. मात्र 2017 ला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. अमित कदम यांच्याकडे सध्या भाजपाचं कुठलंही मोठं पद नाहीये. मात्र कदम यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी धक्का मानला जात आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम