पुण्यातील अश्विनी काटकर-घुगरे यांचे पंतप्रधानयांनी केले कौतुक

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ जुलै २०२२ । कोविड लसीकरणा बाबत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल पुणे- थरकुडे दवाखाना येथे पुणे महानगरपालिका संचलित वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय येथील आरोग्य सेविका सौ. अश्विनी प्रशांत काटकर(घुगरे) यांनी कोविड काळात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची थेट पंतप्रधानांनी दखल घेतली आहे. या कार्यासाठी त्यांना पंतप्रधानांनी खास प्रशंसा पत्र पाठवून त्यांचे कौतुक केले आहे. त्यांनी कोविड काळात कुठलीही भीती न बाळगता, मनातील गैरसमज, भिती दूर करून लसीकरण उद्दिष्ट्य पूर्तीसाठी प्रयत्न केले.

त्यांच्या या कार्याची प्रशंसा करणारे पंतप्रधानांचे पत्र त्यांना १७ जुलै २०२२ रोजी प्राप्त झाले. ८ मार्च २०२१पासून सुरू असलेल्या या अभियानात जिल्ह्यातील सर्वात जास्त लसीकरण करणाऱ्या आरोग्य सेविकांपैकी त्या एक आहे.त्या धुळे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा धुळे महानगरपालिका कर्मचारी राजेंद्र घुगरे यांच्या कन्या आहे. त्यांचे महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय २४/१७ संस्था प्रदेश अध्यक्ष भिमराज घुगरे, प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी बाचलकर, प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्र गठरी, प्रदेश सचीव राजेंद्र बिडकर, युवा प्रदेश उपाध्यक्ष गजानन तोलडी, युवा प्रदेश कार्याध्यक्ष कृष्णा गठरी, नागेद्र दहीहंडे पनवेल, शंकर काटकर, गवळी समाज एकता बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष उमाजी गठरी, शिवाजी औरंगे, भावडू नामदे,भावडू कडीखाऊ, व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम