अखेर झाले स्पष्ट : लाठीमाराचे आदेश गृहमंत्र्यांनी दिलेच नाही !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २१ नोव्हेबर २०२३

जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरू असताना तेथे झालेल्या लाठीमाराचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नव्हते, असे माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीमारानंतर राज्यभरातून मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच संबंधित पोलीस अधिकारी हे टीकेचे लक्ष्य बनले होते. यानंतर स्वतः फडणवीस यांनी त्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. तसेच पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईही केली होती. त्यावेळी झालेल्या लाठीमाराचे आदेश कोणी दिले होते, याबाबत नाना तर्क व्यक्त करण्यात येता होते. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी त्याबाबत सरकारकडून माहिती मागवली होती. त्यास जालना जिल्हा जनमाहिती अधिकारी तसेच पोलीस उपअधीक्षक (गृह) आर. सी. शेख यांनी दिलेल्या उत्तरात, हे आदेशा गृहमंत्रालयातून देण्यात आले नव्हते असे स्पष्ट केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम