दुष्काळाची स्थिती असतांना दोन समाजात आग लावण्याचे षड्यंत्र !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २१ नोव्हेबर २०२३

राज्यात भीषण दुष्काळाची स्थिती, महागाई, वाढती बेरोजगारी, नोकरी नसल्याने तरुणांकडून आत्महत्या यांसारखे टोकाचे पाऊल उचलले जत आहे. अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी सरकार जाणीवपूर्वक मराठा व ओबीसी समाजात वाद निर्माण करण्याचे षड्यंत्र रचत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. सरकारमधील मंत्री सामाजिक शांतता आणि सलोखा बिघडवण्यासाठी चिथावणीखोर विधाने करत आहेत. राज्यपालांनी यात हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात चिघळलेली परिस्थिती, मंत्र्यांकडून होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर सोमवारी टिळक भवन येथे पत्रकार परिषद घेऊन पटोले यांनी टीका केली. आरक्षणाच्या वादात महाराष्ट्र जळता ठेवण्याचे पाप हे भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस यांचेच आहे. २०१४ साली भाजप व फडणवीस यांनीच आरक्षणाचे आश्वासन देऊन सत्ता मिळवली, पण गेल्या ९ वर्षांत भाजपने कोणत्याच समाजाला आरक्षण दिले नाही, याकडे लक्ष वेधत आरक्षणाच्या नावाखाली समाजा-समाजात भांडणे लावण्याचे काम केले आहे, असा आरोप त्यांनी केला. राज्यात दुष्काळाची परिस्थिती भयानक आहे. शेतकऱ्यांना सरकारची मदत अद्याप मिळालेली नाही. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. त्याला भाजप सरकारच जबाबदार आहे, असा आरोप पटोले यांनी केला. खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा केली, पण तीही अजून कागदावरच आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम