शिवसेनारुपी दुध नासविण्याचा प्रयत्न ; भास्कर जाधवांची शिंदे गटावर टीका 

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० ऑक्टोबर २०२२ । शिवसेनेतील बंडखोरी नंतर नुकताच दि ८ रोजी शनिवारी निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ या नावासह ‘धनुष्यबाण’ हे चिन्हही गोठवण्याचा निर्णय शनिवारी घेतला. त्यानंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात रविवारी ( ९ ऑक्टोबर ) ठाण्यातून झाली. यावेळी भास्कर जाधव यांनी शाब्दीक फटकेबाजी करत शिंदे गटावर जोरदार टीका केली.

काय म्हणाले जाधव, आज कोजागिरी पौर्णिमा आहे. मी माझ्या सरकाराऱ्यांना विचारत होतो की, ही मंडळी सुषमा अंधारे यांच्या भाषणापर्यंतच बसणार आहे का? तर ते म्हणाले, तुम्हाला असं का वाटतं? तर मी म्हणालो, आज कोजागिरी पौर्णिमेचा दिवस आहे आणि इथे बसणारी मंडळी ही दुध पिणारी मंडळी आहे. मला वाटतं दसरा मेळावा झाला, तेव्हा आपण सर्व शिवतीर्थावर बसलेली मंडळी होतात, तर दुसऱ्या बाजुला बिकेसीवर गटारी साजरी करणारी मंडळी होती”, असा टोला भास्कर जाधव यांनी शिंदे गटाला लगावला.“कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी आपण दुधात चंद्र बघतो. मात्र, एकनाथ शिंदे हे दुधात मिठाचा खडा पडल्यासारखे निघाले. त्यांनी शिवसेनारुपी दुध नासवण्याचा प्रयत्न केला”, अशी टीकाही भास्कर जाधव यांनी केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम