
सावरकर इंग्रजाचे हस्तकच ; नाना पटोलेंनी भाजपला डीवचल
दै. बातमीदार । १० ऑक्टोबर २०२२ ।सावरकरांनी स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिले असते तर त्यांना इंग्रजांकडून दरमहा ६० रुपये मिळाले नसते. ते इंग्रजांचे हस्तक होते. इंग्रजांचे हस्तक असलेल्या सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. शिवाजी महाराजांना त्यांनी अडीच जिल्ह्याचे राजे म्हटले होते. तसेच सुभाषचंद्र बोस आणि तरुणांनाही त्यांनी सैन्यात जाऊ नका असे म्हटले होते. अशा सावरकरांचा सन्मान भाजप करायला निघालीय अशा शब्दांत पटोलेंनी भाजपला पुन्हा पटोलेंनी भाजपला डीवचल आहे.
विनायक दामोदर सावरकर हे इंग्रजांचे हस्तक होते, त्यांना सन्मान देण्याची काय गरज? असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केले आहे. भाजपवर निशाणा साधताना पटोलेंनी सावरकरांवर केलेल्या या टीकेमुळे आता नवे वादंग निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राहुल गांधी चुकीचे काय बोलले? काँग्रेसची जबाबदारी देश वाचवण्याची आहे. त्यासाठीच काँग्रेसने भारत जोडो यात्रा काढली आहे आणि त्याला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भाजपच्या पायाखालची जमीन सरकलीय अशी टीका पटोलेंनी केली. सावरकरांसारख्या व्यक्तीचा उल्लेख करून राहुल गांधींना बदनाम करणे जास्त काळ चालणार नाही असेही पटोले म्हणाले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम