“त्या” गद्दारीचा बदला घेतला; बावनकुळेंची सनसनाटी टीका

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० सप्टेंबर २०२२ । शिवसेनेने भाजपासोबतची युती तोडत पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या गद्दारीचा बदला घेतला, अशी सनसनाटी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

अमरावती येथील पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमात बोलतांना “एकनाथ शिंदे हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीला धरून चालणारे आहे, तर उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना धुळीस मिळवले असून, बाळासाहेबांचे हिंदुत्व व संस्कार जपण्यासाठी भाजपासोबत पुन्हा युती करण्याचा निर्णय शिंदेनी घेतला आहे” असे चंद्रशेखर बावनकुळे म्हटले आहे.

“अशोक चव्हाण यांनी शिवसेनेच्या प्रस्तावाबाबत वक्तव्य केले, परंतु शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंचे नाव घेण्याऐवजी त्यांनी एकनाथ शिंदेंचे नाव घेतल्याने संभ्रम निर्माण झाला आणि त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या हाती शिवसेनेची सूत्रे नव्हती” असेही ते म्हणाले.

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या असून, अडचणीत सापडलेल्या एकनाथ शिंदेंना बावनकुळेंच्या मदतीचा हात मिळाला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम