मातब्बर व्यक्तीचा शिवसेनेत “भारदस्त” प्रवेश; नवी रणनीती आखली जाणार!

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० सप्टेंबर २०२२ । बंजारा समाजातील भारदस्त व्यक्तिमत्त्वाचे धनी महंत सुनिल महाराज यांनी आज (दि.३०) रोजी शिवसेनेत प्रवेश केला. येत्या निवडणुकीत ते अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांना लढा देण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.

यापूर्वीही महंत सुनिल महाराज यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. मागील काही दिवसांपासून ते शिवसेनेत प्रवेश करतील अशा चर्चाही रंगल्या होत्या. शेवटी आज त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

यावेळी मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महंत सुनिल महाराज यांच्या हाताला शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. बंजारा समाजात पोहरादेवी देवस्थानाचे सर्वाधिक महत्व असल्याने या देवस्थानाचे महंत असलेले सुनिल महाराजांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे अनेक राजकीय मान्यवरांचे याकडे लक्ष वेधले गेले असून, मंत्री संजय राठोड यांना घेरण्याची रणनीती शिवसेना आखत आहे.

याप्रसंगी “आम्ही संजय राठोड यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला, मात्र त्यांनी आमच्याच पाठीत खंजीर खुपसुन गद्दारी केली, म्हणून अशा लोकांना सोबत घेऊन आपण पुढे जाऊ शकत नाही. मोठ्या निष्ठेने सुनिल महाराज पक्षात आले आहेत, त्यामुळे एक शिवसेनाप्रमुखाच्या नात्याने त्यांचे भवितव्य घडवण्याची जबाबदारी ही माझीच आहे. दसऱ्यानंतर मी महाराष्ट्र भ्रमंती करणार असल्यामुळे पोहरादेवी देवस्थानाला भेट देऊन देवीचे दर्शन घेईन” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम