जशने ईद ए मिलादचे पवित्र महिन्याच्या प्रथम दिवशी बेवारस मनोरूगणांना मुस्लिम बांधवांनी दिले १५० जोडी कपडे भेट…

advt office
बातमी शेअर करा...

अमळनेर (आबिदशेख) शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मोत्सव निमित्त ईद ए मिलादचे पवित्र महिन्याच्या प्रथम दिवशी चोपडा येथील वेले गावात मानव सेवा तिर्थ येथे बेवारस मनोरूगणांना १५० जोडी कपडे जळगांव येथील माजी उपमहापौर तथा इकरा संस्था चे संस्थापक अध्यक्ष डॉ हाजी अब्दुल करीम सालार सर व इकबाल प्रोफेसर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले यावेळी करीम सर यांनी मानव सेवा तिर्थ चे व्यवस्थापक नरेंद्र पाटील यांच्या कामाचे कौतुक केले आणि बेवारस मनोरूगणानसाठी निश्चितच औषधे आणि रुग्णवाहिक देण्याचा प्रयत्न करू व जास्तीत जास्त मदद करू असे आश्वासन दिले हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावरील दोन तीन किस्से ही सांगितले व अमळनेर शहरातील मुस्लिम समाजाने केलेल्या कार्याची प्रशंसा केली
अमर संस्था संचलित मानव सेवा तिर्थ वेले येथील आश्रमातील बेवारस मनोरूगणांना आणि बालकांच्या निवासी आश्रमाच्या आठ शे मुले मुलींना असे एकूण ९५० जणांना मुस्लिम समाजाच्या वतीने स्वादिष्ट भोजन व एक शे पन्नास जोडी टी शर्ट पँट देण्यात आली या प्रसंगी जळगांव येथील प्रोफेसर इकबाल शहासर, रशीद खान मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सत्तार मास्टर, हमीद जनाब, कमर अली शहा, हाजी इकबाल मिस्तरी, जब्बार खा पठाण, मोहम्मद इकबाल शेख,जहुर मुतव्वली, कौसर शेख, मा नगरसेवक सलीम टोपी, मुख्तार खाटीक, कमा प्लंबर, शब्बीर हाजी सत्तार, अखलाक शेख, इकबाल शेख फोटोग्राफर, सैय्यद आबिद अली, मुस्तफा प्लंबर, सैय्यद शराफत अली,नविद शेख, रियाज ठेकेदार, फयाज सर, मसुद मिस्तरी, इम्रान शेख हाजी कादर,सईद तेली, अताउल्ला सर, फारूख सुरभी, मुश्ताक सर, सैय्यद अहमद आली,इंजिनिअर इमरान कुरैशी, अरमान मिस्तरी,जमालोदीन शेख, जाविद पेंटर, हाजी रफिक तेली,शेरखा पठाण, सुपडू मनियार, बुधा मिस्तरी,सादीक कुरेशी, आरीफ पठाण, डॉ लियाकत सैय्यद, जाविद कुरैशी,अख्तर तेली,जाकीर मेवाती, सईद लोहार, इरफान बेलदार, युनूस मेवाती, शाहिद तेली,सलीम कुरैशी,फाईक तेली, अशफाक शेख, चोपडा येथील अमर संस्थाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पाटील, अकरम तेली, मुख्तार सरदार, सत्तार मिस्तरी,सह आदि बांधव उपस्थित होते कार्यक्रमात प्रास्ताविक हसनैन करीमैन‌ वेल्फेअर संस्थाचे अध्यक्ष कौसर शेख यांनी केले सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन जावेद अख्तर खाटीक सर यांनी केले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम