वयाच्या तिशीनंतर हे खाणे टाळावे अन्यथा…

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ जून २०२३ । प्रत्येक व्यक्ती तरूण दिसण्यासाठी नेहमीच फिटनेसकडे लक्ष देत असतो, त्यामुळे तो नेहमीच व्यायाम व काय खावे व काय खावू नये याची काळजी घेत असतो. जसजसे वय वाढत जाते तसतसे आपल्या शरीराच्या गरजा बदलत जातात. वयाची तिशी ओलांडल्यावर खाण्या-पिण्याची खूप काळजी घेतली पाहिजे, अन्यथा आपल्याला अशा आजारांना सामोरे जावे लागेल की अकाली म्हातारपणा येईल. या वयात आपल्या शरीरात अनेक बदल होतात, ज्यामुळे थकवा, सांधेदुखी, अंगदुखी आणि अनेक समस्या उद्भवू शकतात. या वयात आपलं शरीर कमकुवत नसलं तरी योग्य आहार घ्यायला हवा.

आहारतज्ञ सांगतात की, वयाची तिशी ओलांडल्यावर जीवनशैली तसेच खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घेतली पाहिजे, अन्यथा ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते आणि भविष्यात आरोग्याशी संबंधित समस्यादेखील उद्भवू शकतात. बटाट्याच्या चिप्सची चव सर्व वयोगटातील लोकांना आवडते, जगभरातील व्यावसायिक चिप्सच्या व्यवसायातून कोट्यवधी रुपये कमावतात, हा पदार्थ कितीही लोकप्रिय असला तरी तो आरोग्यासाठी चांगला नाही. जर तुमचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त असेल तर ते टाळा. कारण चिप्स चवीने चांगले व्हावेत म्हणून ते सिंथेटिक गोष्टींमध्ये मिसळले जातात. तसेच त्यात सोडियमचे प्रमाण जास्त आहे ज्यामुळे रक्तदाब वाढतो.

दही खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप फायदा होतो यात शंका नाही, यामुळे शरीर थंड तर होतेच, शिवाय पचनाशी संबंधित समस्याही दूर होतात, पण जर तुम्ही तुमचा 30 वा वाढदिवस साजरा केला असेल तर चवदार दहीपासून दूर राहा कारण त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो.
मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पाहताना किंवा संध्याकाळी घरी पॉपकॉर्न खायला आपल्याला आवडतं, हे निरोगी पद्धतीने बनवल्यास ते आरोग्यदायी ठरू शकतं, पण सहसा बाजारात ते बनवण्यासाठी भरपूर मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचा वापर केला जातो, ज्यामुळे कोलेस्टेरॉल वाढू शकतं. तिशीनंतर या पदार्थापासून देखील दूरच राहावं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम