वरगव्हाण येथे शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात

विद्यार्थी व पालकांचा मोठ्या प्रमाणात मेळाव्यात सहभाग

बातमी शेअर करा...

बातमीदार | 16 जून 2023 | १५ जून शाळेचा पहिला दिवस. मनात नवी आशा, नवी आकांक्षा, नवी स्वप्ने घेऊन चिमुकल्यांच्या चिवचिवाटासह जि.प.प्रा.शाळा वरगव्हाण गजबजून गेली.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : मध्यरात्री चार जण ठार !

शाळेचा कोपरा न् कोपरा बालकांच्या सहवासाने प्रफुल्लित

भरतनाट्यम गुरु श्री गणेशन यांनी मंचावरच सोडला प्राण !

वृक्षसंवर्धन प्रत्येकाची जबाबदारी – आयुक्त विद्या गायकवाड

होऊन गाऊ लागला… “ही आवडते मज मनापासूनी शाळा, लाविते लळा ही जशी माऊली बाळा. ”

दरवर्षाप्रमाणे या वर्षीही पहिलीत दाखल होणा-या मुलांची वाजतगाजत चारचाकी गाडी मिरवणूक काढण्यात आली. शैक्षणिक घोषणांनी परिसर दणाणून गेला, शाळेत येणा-या प्रत्येक बालकांच्या चेह-यावर शाळा उघडण्याचा आनंद ओसंडून वाहत होता. मिरवणूकीनंतर शाळेच्या पटांगणात शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यात विविध स्टॉलची मांडणी करण्यात आली होती यात शारीरिक विकास, भाषा विकास,बौद्धिक विकास, सामाजिक विकास इ. स्टॉलची मांडणी केली. या मेळाव्यात पहिलीत दाखल होणाऱ्या 25 विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्याला शाळेत येण्यापूर्वी शाळेविषयी गोडी निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचा पाया घातला जावा यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले असते.यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे व गणवेशाचे वाटप करण्यात आले. पुष्पगुच्छ व पेढे वाटून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

मेळाव्यासोबत शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक केदारेश्वर चव्हाण सर,गावचे पोलीस पाटील नानासो गोरख पाटील व अंगणवाडी मदतनीस श्रीमती निर्मला पाटील यांचा सेवापुर्ती सोहळा पार पडला. केदारेश्वर चव्हाण सर हे ३३ वर्ष शिक्षण क्षेत्रात प्रदिर्घ काळ व्यथित केला, त्यांचा सत्कार नेमिचंद आप्पा सोनार यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच वरगव्हाण गावाचे पोलिस पाटील नानासो गोरख पाटील यांनी देखिल अनेक वर्ष गावाची सेवा करत अनेक सामाजिक कार्य करून गावाचे नावलौकिक मिळवला. त्यांचा सत्कार जयसिंग तात्या पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर अंगणवाडी मदतनीस श्रीमती निर्मलाबाई पाटील यांचा सन्मान हाफिजा तडवी यांच्या हस्ते करण्यात आला. सेवापूर्ती निमित्त शाळेच्या वतीने तिन्ही मान्यवरांना विठूरूखमाईची मुर्ती भेट म्हणून देण्यात आली. तसेच सरपंच भुषण पाटील व ग्रामपंचायत सदस्य रविंद्र पाटील, जहांगीर तडवी, यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने देखील तिन्ही ही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांनी देखिल छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच नवीन रूजू झालेल्या संदिप निकम सर यांचे देखिल स्वागत करण्यात आले.

शाळापूर्व तयारी मेळाव्यास शा. व्य. स. अध्यक्षा श्रीमती हाफिजा तडवी, उपाध्यक्ष मुजात तडवी, सदस्य लतीब तडवी, दिनेश सोनार, निसार तडवी, संजय तडवी, तय्यब तडवी आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरीफ तडवी सर यांनी केले व आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका श्रीमती पाटील यांनी मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम