आरक्षण द्यायचे नाही असे दोन तीन जणांना ठरवले ; मनोज जरांगे पाटील !
बातमीदार | ७ नोव्हेबर २०२३
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही दिवसापासून उपोषण सुरु केले होते मात्र सरकारच्या काही मंत्र्यांनी शब्द देत हे उपोषण तूर्त मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजी नगरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी सरकारला लक्ष करीत सरकार विरोधात टीका केली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले कि, मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही असे दोन ते तिन जणांनी ठरवले आहे. त्यामुळे मराठ्यांच्या विरोधात षडयंत्रण रचले जात असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. सरकारचे शिष्टमंडळ उद्या भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिली. भुजबळांच्या नातेवाईकांचे हॉटेल त्यांच्याच जवळच्याच कुणीतरी फोडले असल्याचा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली. मराठ्यांना आरक्षण मिळू नये, यासाठी ओबीसी नेते प्रयत्न करत असल्याचेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
शांततेत आंदोलन सुरु असताना त्यांना उचकवण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. याकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याचे आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यासाठी पुरवणी याद्या तयार केल्या जात आहे. यात चार ते पाच हजार मराठ्यांना अडकवण्याचा कट असल्याचेही जरांगे म्हणाले. याकडे सरकार लक्ष देत नसेल तर याकडे मराठा नेत्यांनी तरी लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, मराठा समाज खचणार नाही, असा दावा देखील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मराठा समाजाविरोधातला डाव मराठा नेत्यांनी हाणून पाडावा असे आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला. बीड, नांदेडसह महाराष्ट्रातील एसपींवर दबाव आणला जात असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम