अखेर बजरंग पुनियाला जामीन मंजूर !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १० नोव्हेबर २०२३

प्रशिक्षक नरेश दहिया यांच्या मानहानीच्या प्रकरणात कुस्तीपटू बजरंग पुनियाला दिल्ली न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधातील आंदोलनादरम्यान बजरंगने दहियावर बलात्काराचा खटला प्रलंबित असल्याने त्याला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला विरोध करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे म्हटले होते. त्याविरोधात दहिया यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

बजरंगला नुकतेच आशियाई स्पर्धेतून पदकाशिवाय परतावे लागले होते. त्याने या मानहानीप्रकरणी न्यायालयात स्वतःच्या उपस्थितीपासून सूट मागितली होती. त्यामुळे पहिल्या तीन सुनावणीला तो उपस्थित नव्हता. गुरुवारी प्रत्यक्ष हजर झाल्यानंतर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. दहियाने न्यायालयात दावा केला की, बलात्कार प्रकरणात आपण निर्दोष मुक्त झालो आहोत आणि बजरंगच्या वक्तव्यामुळे आपले नाव कलंकित झाले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ५ मार्च रोजी निश्चित करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम