गृहखात्याची उडविली झोप : पोलिसांना पाकीट देण्याचा व्हिडीओ व्हायरल !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १० नोव्हेबर २०२३

पुण्यातील पोलिसांच्या व्हॅनचा एक व्हिडीओ पोस्ट करून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गृहखात्याची झोप उडवली आहे. काही तरुण पोलिसांना काही पाकिटे देतात, असे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. पुण्यात ज्या ठिकाणी हा प्रकार घडला, त्याच ठिकाणी उभे राहून सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

त्या म्हणाल्या, हा जेल परिसर आहे. इथून २०० मीटर अंतरावर जेल आहे. बाजूला जात पडताळणी केंद्र आहे. पुढे महिला सुधारगृह आहे. या संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही नाही. मुद्दा हा आहे की, तुरुंगातील कैद्यांना भेटायला त्यांचे साथीदार जाणार असतील, वाईट प्रवृत्तीचे लोक येथे वावरणार असतील, या रस्त्यावर अनुचित प्रकार घडला तर सीसीटीव्ही कुठे आहे ? गाडी येते आणि थांबते. व्हिलरवरून दोन लोक येतात, एक मुलगा खाली उतरतो. तिथून एक पोलीस अधिकारी उतरतो, त्या पोलीस अधिकाऱ्याशी तो मुलगा बोलतो. त्यांच्यात काही देवघेव होते. तेव्हा व्हॅनचा उघडला जातो. पाकिटे, पिशव्या आत जातात. एवढ्या छोट्या पाकिटातून काय दिले, हे कळले पाहिजे. अब्रुनुकसानीचे दावे ठोकणारे सरकारमधील सर्व मंत्री, आता गृहखात्यावर काही बोलणार आहेत का? तुमच्या अब्रूची लक्तरे संपूर्ण महाराष्ट्रात टांगलेली आहेत, अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम