पीएम मोदी “मिनी इंडिया” च्या दौऱ्यावर

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ नोव्हेंबर २०२२ । पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या गुजरात दौरा करीत आहेत. या दौऱ्यात मोदी अहमदाबाद, गांधीनगर, सूरत, भावनगर आणि अंबाजी या ठिकाणी भेट देऊन तेथील विकासकामांच्या प्रकल्पांचे स्वहस्ते भूमिपूजन व लोकार्पण करतील.

येत्या गुजरात विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे वृत्त आहे. या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असतांना मोदींनी सुरतमधील तब्बल ३,४०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे. तसेच गुजरातमध्ये प्रथमच ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडणार असून, मोदींच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी मोदींच्या स्वागतासाठी प्रचंड जनसमुदाय हजर होता.

गुजरातमध्ये डबल इंजिन सरकारने सत्तेचा जम बसविल्यानंतर घरबांधणीची कामे गतिमान झाली आहेत. तसेच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत अनेक गोरगरिबांना मोफत वैद्यकीय उपचारही मिळाले आहेत. यात ३२ लाख गुजरातचे तर १.२५ लाख लाभार्थी एकट्या सुरतमधील आहे. नवरात्रोत्सवाच्या पावनदिनी पायाभूत सुविधांचे भूमिपूजन व क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करणे हे मी माझे भाग्य समजतो. एकात्मतेचे, एकतेचे दर्शन घडवणारे सुरत हे मिनी इंडिया आहे, असे पंतप्रधान मोदींनी या दौऱ्यात म्हटले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम