बातमीदार| २५ सप्टेंबर २०२३ | देशासह राज्यात गणेशोत्सवाची मोठी धामधूम सुरु आहे. यात देखील गोडाच्या पदार्थावर ताव मारला असेलच. त्यामुळे पोटात गडबड झालीये काय करावं सुचत नाहीये? तर जरा थांबा. पोटाचे आरोग्य राखणे आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
आपली पचनसंस्था चांगले पचन, पोषक तत्वांचे शोषण आणि रोगप्रतिकारशक्तीचे कार्य यामध्ये अधिक महत्त्वाची भूमिका बजावते. बरेचदा पोट बिघडण्याचे सर्वात मोठे कारणं खराब जीवनशैली ज्याचा परिणाम आपल्या पोटाच्या आरोग्यावर होतो. जर तुम्हालाही तुमचे पोट निरोगी ठेवायचे असेल तर या चुका टाळा.
सण आले म्हटलं की, गोडाचे पदार्थ आपण अतिरिक्त प्रमाणात खातो. ज्याचा आपल्या सर्वात आधी परिणाम पचन संस्थेवर होतो. जर तुमचे ही पोट बिघडले असेल तर संतुलित आहार घ्या. तुमच्या आहारात फळे, भाज्या, कडधान्य, प्रथिने आणि आंबवलेले पदार्थ यांचा समावेश करा.
बिघडलेल्या पोटाचे आरोग्य राखण्यासाठी फायबर अधिक महत्त्वाचे मानले जाते. ज्यामुळे आतड्याची हालचाल आणि बद्धकोष्ठता सुधारण्यास मदत होते. याशिवाय पोटात असलेले चांगले बॅक्टेरिया वाढवण्याचे काम करते. यासाठी तुम्ही आहारात धान्य, कडधान्ये, फळे आणि भाज्यांचे सेवन करा.
पोटाचे आरोग्य बिघडते ते डिहायड्रेशनमुळे. शरीरातील पाणी कमी झाले की, बध्दकोष्ठतेचा त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी प्या दिवसभरात किमान 8 ग्लास पाणी पिणे महत्त्वाचे आहे.
पुरेशी झोप न घेतल्यामुळे पोटाच्या आरोग्यावर परिणाम होतो. ज्यामुळे पोटातील बॅक्टेरियाचे संतुलन बिघडते. यासाठी ७ ते ९ तासांची पूर्णपणे झोप घेणे महत्त्वाचे आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम