चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी भस्म आरती !
बातमीदार | २३ ऑगस्ट २०२३ | गेल्या ३० दिवसापूर्वी भारतातून चांद्रयान-3 ने झेप घेतली होती ती झेप आज संध्याकाळी 6.04 वाजता चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. ते यशस्वी होण्यासाठी देश-विदेशात उपासना-प्रार्थना सुरू आहे. चांद्रयान-3 साठी देशभरातील मंदिरांमध्ये हवन-पूजन करण्यात आले. मशिदींमध्ये नमाज अदा करण्यात आली. शाळांमधील मुलांनीही यासाठी प्रार्थना केली.
चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी बुधवारी उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात विशेष भस्म आरती करण्यात आली. दुसरीकडे अजमेरच्या दर्गा शरीफमध्ये लोकांनी नमाज अदा केली. चांद्रयान-3 च्या लँडिंगचे थेट प्रक्षेपण उत्तर प्रदेशातील सरकारी शाळा आणि मदरशांमध्ये केले जाईल. 5.15 ते 6.15 या कालावधीत राज्यातील शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये त्याचे प्रसारण होणार आहे. मिशनचे लाईव्ह कव्हरेज हरियाणातील शाळांमध्येही दाखवले जाईल.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम