“त्या” वक्तव्याबाबत भुजबळांची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ सप्टेंबर २०२२ । माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या “शारदा मातेची पूजा करायची कशाला?” या वक्तव्यामुळे राज्यात चांगलाच गदारोळ माजला. यावर स्पष्टीकरण देत खुद्द भुजबळांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

BJP add

सत्यशोधक समाजाच्या आदरसत्काराच्या कार्यक्रमात अखिल भारतीय समता परिषदेच्या व्यासपीठावर बोलताना भुजबळ यांनी “ज्यांना आपण पाहिले नाही, ज्यांनी आपल्याला शिकवले नाही, त्या शारदा मातेचे शाळेत छायाचित्र का लावावे? जर फोटो लावायचेच असेल तर सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे लावावे. कारण, यांनी फक्त तीन टक्के लोकांना शिकवले व आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवले, मग यांची पूजा का करावी” असे वक्तव्य केले होते.

मात्र, यावर स्पष्टीकरण देतांना छगन भुजबळ “मलाही माझे मत मांडण्याचा अधिकार आहे. माझ्या वक्तव्याचा वेगळाच अर्थ काढला गेला असून, शाहू, फुले, आंबेडकरांनी आपल्याला शिकवले. महिलांच्या शिक्षणासाठी कार्य केले म्हणून, त्यांचा आदर करायला हवा, त्यांची पूजा करायला हवी, असे म्हणायचे होते” ही प्रतिक्रिया दिली.

“आपल्याला शारदामातेने शिकवले नाही, त्यामुळे सरस्वती पूजनाचा प्रश्नच येत नाही. मीही हिंदूच आहे, हिंदूंसाठी बरीचशी कामे केली, देवीच्या दर्शनासाठीही जातो. परंतु देवीऐवजी महापुरुषांना सम्मान होणे आवश्यक आहे”, असेही भुजबळ म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम