केंद्र सरकारची असंवेदनशीलता; खासदार सुळेंनी नोंदवला निषेध

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ सप्टेंबर २०२२ । घरगुती गॅस सिलेंडरच्या वापरावरील बंधनांमुळे नागरिकांचे जेवण आणि सण साजरे करणे कठीण झाले असून, एक गृहिणी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारचा निषेध केला आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ट्विट करत, “ऐन सणासुदीच्या काळात सरकारने जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी गृहिणींच्या चिंतेत अजून भर घातली आहे. एकीकडे सिलेंडरच्या दरांत अव्वाच्या सव्वा वाढ करायची आणि मग त्यांच्या वापरावर बंधने आणायची, यावरून केंद्र सरकारची असंवेदनशीलता स्पष्टपणे दिसून येत आहे” अशा शब्दांत जाहीर निषेध नोंदवला आहे.

केंद्राच्या या नवीन नियमानुसार उज्ज्वला गॅस योजनेच्या ग्राहकांना वर्षाला १५ आणि अनुदानित ग्राहकाला १२ तसेच दोन जणांसाठी महिन्याला २ सिलेंडरचा कोटा निश्चित करून गृहिणींची चिंता वाढवली आहे. आता अशात जर एखाद्या ग्राहकाला अतिरिक्त सिलेंडर हवे असेल, तर त्याला संबंधित गॅस कंपनीची परवानगी घेऊन कंपनीला आवश्यक कागदपत्रे सादर केल्याखेरीज सिलेंडर मिळणार नाही. असे होण्याने घरगुती जेवणाचे डबे करणाऱ्या महिला, समूहाने पेइंग गेस्ट म्हणून राहत असलेले विद्यार्थी तसेच सणांना विविध पदार्थ तयार करून सण साजरा करणाऱ्यांचे हाल होत आहे.

म्हणून हा निर्णय संपूर्ण महिला वर्गाला चिंतेत टाकणारा असून, त्यांना घर कसे चालवावे? हा प्रश्न पडला आहे. एकीकडे सरकार “ई-गव्हर्नन्स” चा गाजावाजा करते व दुसरीकडे नागरिकांना कागदपत्रांसाठी फिरवते, यातून केंद्र सरकारच्या कुचकामी कार्यप्रणालीचे दर्शन होत असल्याचेही खासदार सुळे म्हटल्या आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम