शिंदेंचे “या” पक्षात जाण्याचे प्लानिंग?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ नोव्हेंबर २०२२ । माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या दाव्यांमुळे महाराष्ट्र राज्याचे राजकारण हादरून गेले आहे.

BJP add

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडून हे पद मिळवले असून, आता ते शिवसेनेवरील मालकी हक्क व चिन्हासाठी सर्वोच्च न्यायालयात संघर्ष करत आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सत्ता स्थापनेसाठीचे आमंत्रणही दिले होते, असा दावा करत शिवसेनेच्या शिष्टमंडळात शिंदेही होते, असे अशोक चव्हाण म्हणाले.

यावेळी चंद्रकांत खैरे यांनीही एकनाथ शिंदे हे शिवसेनेला दगा देऊ शकतात हे साऱ्यांनाच माहीत होते, म्हणून ते १५ आमदारांना सोबत घेऊन काँग्रेस पक्षात येणार होते, परंतु काही गोष्टींमुळे हा प्रयत्न शक्य झाला नाही, असा खळबळजनक आरोप केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम