भुजबळ यांनी कुणाचा बंगला हडप केला : मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २२ नोव्हेबर २०२३

राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरा करीत असतांना आता त्यांनी थेट राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर हल्लबोल केला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले कि, भुजबळ कुठे भाजी विकत होते, कुणाच्या येथे काय करत होते, त्यांनी कुणाचा बंगला हडप केला हे सर्व मला ठावूक आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मराठा समाजाला पुन्हा हानी होऊ न देण्याचे आवाहनही केले. मनोज जरांगे यांची नाशिक या छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात सभा झाली.

त्यात त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. भुजबळ कुठे भाजी विकत होते, कुणाच्या येथे काय करत होते, मुंबईला काय केले, कोणत्या नाटकात काम केले, कोणत्या पिक्चरमध्ये काम केले हे सर्व मला माहिती आहे. त्यांनी कुणाचा बंगला हडप केला, हेही मला माहिती आहे, असे मनोज जरांगे म्हणाले. जरांगे पुढे बोलताना म्हणाले की, ते बिचारेही माझ्याशी खोटे बोलत नाही. मी म्हटले की, तुम्ही महाराष्ट्र सदनातील मराठी माणसांचा पैसा खाल्ला. त्यामुळे त्यांना गोरगरीब जनतेचा तळतळाट लागला. ते तुरुंगात गेले. तिथे बेसण भाकर खाल्ली. यावर ते म्हणाले की, कांदाही मिळतो. मग खा आणखी 5 किलो कांदे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम