हजारो तरुणांना नोकरीची मोठी संधी : इंटेलिजन्स ब्युरोची भरती !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २२ नोव्हेबर २०२३

देशभरातील हजारो तरुणांना नोकरी विषयक एक बातमी समोर आली आहे. दि.२१ नोव्हेंबर 2023 रोजी इंटेलिजन्स ब्युरोने बंपर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहिर केली आहे. Intelligence Bureau (IB) ने सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड 2/कार्यकारी पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. गृह मंत्रालयाच्या या भरतीची अधिसूचना 25 नोव्हेंबर ते 01 डिसेंबर 2023 च्या रोजगार वृत्तपत्रात प्रकाशित झाली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 995 पदे भरण्यात येणार आहेत. खाली भरतीशी संबंधित अधिक तपशील जाणून घ्या.

अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 25 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होईल. 15 डिसेंबर 2023 पर्यंत उमेदवार नोंदणी आणि परीक्षा शुल्क ऑनलाइन भरू शकतील. 19 डिसेंबरपर्यंत SBI चालान मोडद्वारे फी भरता येईल. अर्ज करण्यास इच्छुक असलेले आणि पात्रता पूर्ण करणारे उमेदवार गृह मंत्रालयाच्या mha.gov.in या वेबसाइटवर सक्रिय केलेल्या लिंकद्वारे अर्ज करू शकतात. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिसूचनेमध्ये दिलेल्या पात्रता अटी वाचण्याचा सल्ला दिला जातो. चुकीचा भरलेला फॉर्म स्वीकारला जाणार नाही.

उमेदवार पात्रता आणि वय
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड 2/कार्यकारी पदाच्या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, नियमानुसार आरक्षित प्रवर्गासाठी कमाल वयात सूट देण्याची तरतूद आहे.

निवड कशी होईल?
लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे या IB पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. प्रथम लेखी परीक्षा घेतली जाईल. ज्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
एकूण 995 पदांवर भरती केली जाईल

सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड 2/IB च्या एक्झिक्युटिव्हच्या एकूण 995 पदांवर भरती केली जाईल. यामध्ये एकूण 377 पदे अन आरक्षित आहेत. तर 222 पदे OBC-NCL साठी, 134 SC साठी, 133 ST साठी, 129 EWS साठी राखीव आहेत. अर्ज करण्यापूर्वी, भरती सूचना काळजीपूर्वक वाचा. पोस्ट, पात्रता वयोमर्यादा यासारखी अधिक माहिती तेथे दिलेली असते.
या पदांवर निवड केल्यास पगार चांगला असतो. मूळ वेतन 44,900 रुपये आहे आणि उमेदवारांना कमाल 1,42,400 रुपये प्रति महिना दिले जातील. यासोबतच त्यांना डीए, एसएसए, एचआरए, टीए अशा सर्व सुविधा मिळतील. नोंदणी करण्यासाठी, उमेदवारांना 450 रुपये शुल्क भरावे लागेल. तर पुरुष उमेदवार, UR, EWS आणि OBC श्रेणींसाठी 550 रुपये शुल्क आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम